रचना
भारताच्या घटनेने स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रशासन लोकापयोगी करण्याकरिता मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मध्ये संलग्नित असलेल्या कलम 50टट या नवीन कलमामध्ये सुधारणा करुन सत्तेचे विकेंद्रीकरण करण्यात आले त्याअनुषंगाने मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 16 प्रभाग समित्या तयार करण्यात आल्या. प्रत्येक प्रभाग समितीत प्रभागातून निवडून आलेल्या नगरसेवकांचा समावेश असतो.(पोट कलम (2) (ब)). विभाग अधिकारी हा प्रभाग समितीच्या क्षेत्राचा अधिकारी असेल.(कलम (2) (ब)). प्रभाग समिती क्षेत्रामधील सामाजिक कल्याण कार्यक्रमामध्ये व्यस्त असलेल्या प्रतिष्ठीत बिगर शासकीय संस्था आणि सामाजिक संस्थांचे तीनाहून कमी इतके सदस्य पोटकलम (अ) मध्ये संबोधलल्या नगरसेवकांमार्फत नामनिरर्देशित केली जातात. (पोटकलम (2)(क)). प्रभाग समित्यांचा कालावधी महानगरपालिकेच्या कालावधीइतकाच असतो.
कामकाज
अद्ययावत् सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, 188 च्या कलम 50 टटचे पोटकलम 7 ची कंडिका (अ), (ब) आणि (क) अन्वये निश्चित केलेल्या प्रभाग समितीच्या कामकाजाव्यतिरिक्त सदर अधिनियमाच्या उपरोक्त कलमाचयश पोटकलम 8 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महानगरपालिका ह्याद्वारे पुढे नमूद केलेले कामकाज प्रभाग समितीकडे सोपवित आहेः-
- रस्ते व चौक यांचे नामकरण् व पुर्नानामकरण करण्यासंबंधतील सूचना.
- प्रत्येक नगरसेवकाच्या मतदारसंघातील, अनपेक्षित कामांकरिता असलेल्या ठोक तरतुदीमधून(नगरसेवक निधि) करावयाची कामे आणि अर्थसंकल्पीये तरतुदीमधून करावयाची कामे.
- स्वच्छता राखण्यासंबंधातील सूचना/प्रस्ताव
- मंडयांच्या दुरुस्तीसंबंधातील सूचना/प्रस्ताव
- रस्त्यांच्या राखण्यासंबंधातील सूचना/प्रस्ताव
- शालेय इमारती आणि महानगरपालिकेच्या इतर इमारती इ. ची दुरुस्ती यासंबंधातील सूचना/प्रस्ताव.
- उद्यानांचा विकास व त्यांचे परिरक्षण यासंबंधातील सूचना/प्रस्ताव
- गांडूळ खत प्रकल्प योजनेसंबंधातील सूचना/प्रस्ताव
- महानगरपालिकेचे दवाखाने व रुग्णालये यांच्या परिरक्षणासंबंधातील सूचना/प्रस्ताव
- रस्त्यांचे सुशोभिकरण करण्यासंबंधातील सूचना/प्रस्ताव
- पदपथांची दुरुस्ती करण्यासंबंधातील सूचना/प्रस्ताव
विद्यमान रचना
सद्यस्थितीत, 17 प्रभाग समित्या आहेत त्या पुढीलप्रमाणे
|
|