वर्ष | प्रगतीदर्शक आलेख |
1807 | कोर्ट ऑफ पेटी सेशन्सची स्थापना-दोन मॅजिस्ट्रेटस् आणि एक जस्टिस ऑफ पीस. |
1845 | नागरी सप्तप्रधान मंडळ. |
1858 | त्रिसदस्य आयुक्त मंडळ. |
1865 | एक महापालिका आयुक्त आणि जस्टिसेस् ऑफ पीस मिळून बनलेले मंडळ. |
1872 | 64 सदस्य असलेल्या महापालिकेची रीतसर स्थापना. करदात्यांना मतदानाचा अधिकार (मुंबई अधिनियम क्र. 3-1872). |
1873 | लोकशाही पध्दतीवर आधारित महानगरपालिकेची पहिली सभा, दिनांक 4 सप्टेंबर 1873 रोजी भरली. |
1907 | प्राथमिक शिक्षणविषयक संपूर्ण जबाबदारी महापालिकेकडे सोपविण्यात आली. |
1922 | फक्त करदात्यांऐवजी, भाडेकरुंनाही मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. (मुंबई अधिनियम क्र. 4). |
1931 | अध्यक्ष हे नामाभिधान महापौर याप्रमाणे बदलण्यात आले. (मुंबई अधिनियम क्र. 21). |
1933 | दि. 1 ऑक्टोबर 1933 रोजी सुधार विश्वस्त मंडळ हे मुंबई महानगरपालिकेत विलीन करण्यात आले. (मुंबई अधिनियम क्र. 13-1933). |
1947 | दि. 7 ऑगस्ट 1947 रोजी ’बेस्ट“ कंपनी लिमिटेड महानगरपालिकेत विलीन झाली. |
1948 | प्रौढ मतदान पध्दती प्रथमच अस्तित्त्वात आली. |
1950 | उपनगर विभाग महानगरपालिकेत विलीन करण्यात आले. (मुंबई अधिनियम क्र. 7-1950). |
1952 | ह्या वेळेपर्यंत महानगरपालिकेवर काही खास प्रतिनिधी पदसिद्ध सदस्य म्हणून काम करीत असत. (म्हणजे पोलीस आयुक्त, बी.पी.टी.चे अध्यक्ष, कार्यकारी अभियंता, इलाखा विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, मुंबई शासन, इ.) ही पद्धत बंद करण्यात आली आणि अशाप्रकारे मुंबई महानगरपालिका खऱया अर्थाने लोकप्रतिनिधी संस्था बनली. (मुंबई अधिनियम क्र. 48-1950). |
1957 | विस्तारित उपनगरे महानगरपालिकेत विलीन करण्यात आली. (मुंबई अधिनियम क्र. 58-1956). |
1963 | 140 एकसदस्य मतदारसंघांची स्थापना. |
1968 | तद्नुसार, पहिली निवडणूक घेण्यात आली. (महाराष्ट्र अधिनियम क्र. 33-1966). |
1972 | महानगरपालिकेच्या कामकाजाची अधिकृत भाषा म्हणून मराठीस (राज्यभाषा) मान्यता देण्यात आली. (महानगरपालिकेचा दिनांक 30-3-1972 चा ठराव क्र. 1959). |
1973 | महानगरपालिकेची शताब्दी साजरी करण्यात आली. |
1976 | अनुसूचित जातींच्या नगरसेवकांकरिता मतदारसंघ राखीव ठेवण्यात आले. (महाराष्ट्र अधिनयम क्र. 42-1976). |
1982 | - दि. 25 मार्च 1982 रोजी महापौरपदाचा सुवर्णमहोत्सव संपन्न झाला.
- सदस्यसंख्या 140वरून 170इतकी वाढविण्यात आली.(महाराष्ट्र अधिनियम क्र.25-1982).
|
1983 | - सुधार समितीचा सुवर्ण महोत्सव दि. 7 नोव्हेंबर 1983 रोजी संपन्न झाला.
- महाराष्ट्र शासनाने, आपल्या दि. 3 मार्च 1983 च्या अधिसूचनेनुसार, नगरसेवकांच्या निवृत्तीचा कालावधी एक वर्षाने म्हणजेच, दि. 1 एप्रिल 1984 रोजी, दुपारी 12-00 वाजेपर्यंत वाढविला.
- अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त म्हणून एक अथवा अधिक व्यक्तींची नियुक्ती करण्याची तरतूद. (महाराष्ट्र अधिनियम क्र. 43-1983).
|
1984 | दि. 1 एप्रिल 1984 पासून प्रशासकाची नियुक्ती. (महाराष्ट्र अधिनयम क्र. 7-1984). |
1985 | - प्रशासकाची नियुक्ती चालू ठेवण्यात आली. (महाराष्ट्र अधिनियम क्र. 3-1985).
- दि. 25 एप्रिल 1985 रोजी 170 जागांसाठी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या व त्यानंतर दि. 10 मे 1985 पासून नवीन महानगरपालिका अस्तित्त्वात आली.
|
1987 | मुंबई अग्निशमन दलाचा शताब्दि सोहळा. |
1989 | - स्थायी समिति, सुधार समिति व शिक्षण समिति ह्यांवरील सदस्यसंख्येत 16 वरुन 20 इतकी आणि ’बेस्ट“ समितीवरील सदस्यसंख्येत 9 वरुन 12 इतकी, ह्याप्रमाणे वाढ. (महाराष्ट्र अधिनियम क्र.21-1989).
- राज्य शासनाने मतदानासाठी अधिसूचित केलेल्या तारखेला वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या व्यक्तींना महानगरपालिका निवडणूक यादीत नाव नोंदविण्याचा अधिकार प्राप्त झाला. (महाराष्ट्र अधिनियम क्र. 28-1989).
|
1990 | - कोणतीही सर्वसाधारण निवडणूक किंवा पोटनिवडणूक ह्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम तारखेपर्यंत वयाची 21 वर्षे पूर्ण करणाऱया व्यक्तीस विभागीय निवडणुका लढविण्याचा अधिकार प्राप्त झाला. (महाराष्ट्र अधिनियम क्र. 12-1990).
- एकूण जागांपैकी 30 टक्के जागा (अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारांकरिता राखून ठेवलेल्या जागांसहित), महिलांसाठी राखून ठेवण्यात आल्या. (महाराष्ट्र अधिनियम क्र. 13-1990).
|
1991 | - एकसदस्य मतदारसंघांची संख्या 221 इतकी निश्चित करण्यात आली. (असाधारण राजपत्रात प्रसिद्ध झालेली दि. 28 फेब्रुवारी 1991 ची अधिसूचना क्रमांक बीएमसी/ 1091/ सीआर/ 28/ 91/ न.वि.-20).
- दि. 1 एप्रिल 1991 पासून वडाळा येथील ऍक्वर्थ लेप्रसी रुग्णालय बृहन्मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेतले (महानगरपालिकेचा दि. 27 नोव्हेंबर 1991 चा ठराव क्र. 881 पहा.) आणि सदर रुग्णालयाचे नांव ’कुष्ठरोग्यांकरिता ऍक्वर्थ महानगरपालिका रुग्णालय“ असे बदलण्यात आले.
|
1992 | - महिलांकरिता 30 टक्के जागांच्या आरक्षणासह 221 जागांसाठी नववी सार्वत्रिक निवडणूक, दि. 25 फेब्रुवारी 1992 रोजी घेण्यात आली आणि दि. 7 मार्च 1992 पासून नवीन महानगरपालिका आस्तित्त्वात आली.
- दि. 12 मार्च 1992 रोजी, संसर्गजन्य रोगांकरिता असलेल्या कस्तुरबा रुग्णालयाचा शताब्दि सोहळा संपन्न झाला.
- दि. 29 मार्च 1992 रोजी तानसा येथे तानसा धरण शताब्दि सोहळा संपन्न झाला.
- स्थायी समिति, सुधार समिति, शिक्षण समिति ह्यांवरील सदस्य संख्येत अनुक्रमे, 20वरुन 27, 20वरुन 26, 20वरुन 26 इतकी आणि ’बेस्ट“ समितीवरील सदस्यसंख्येत 12वरुन 17इतकी, ह्याप्रमाणे वाढ. (महाराष्ट्र अधिनियम क्र. 21-1992).
|
1993 | - दि. 16 जानेवारी 1993 रोजी महानगरपालिका सभागृहाची आणि दि. 31 जुलै 1993 रोजी महानगरपालिका मुख्यालयाच्या जुन्या इमारतीची शताब्दि साजरी करण्यात आली.
- मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 38-अ अन्वये नियुक्त केलेल्या विशेष समित्यांवरील सदस्यसंख्या 24वरुन 36 ह्याप्रमाणे वाढविण्यात आली. (महानगरपालिकेच्या दि. 17-12-1993 चा ठराव क्र. 1066).
|
1994 | 74 व्या घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने, 1994 च्या महाराष्ट्र अधिनियम क्र. 41 अन्वये, मुंबई महानगरपालिका अधिनियमात पुढील महत्त्वाच्या दुरुस्त्या करण्यात आल्या:- महानगरपालिकेवर पाच नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती.
- अनुसूचित जाती/जमाती, इत्यादींमधील आरक्षणासहित महिलांसाठी एक तृतीयांश जागांचे आरक्षण.
- एकूण सदस्य संख्येपैकी 27 टक्के जागा मागासवर्गीय नागरिकांसाठी आरक्षित.
- महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिकांमधील महापौरपदाकरिता अनुसूचित जाती/ जमाती, मागासवर्गीय नागरिक आणि महिला ह्यांच्याकरिता आळीपाळीने आरक्षण.
- महानगरपालिका निवडणुकीच्या बाबतीत पर्यवेक्षण, मार्गदर्शन आणि नियंत्रण हे अधिकार महानगरपालिका आयुक्तांऐवजी राज्य निवडणूक आयुक्तांना देण्यात आले.
- प्रभाग समित्यांची प्रस्थापना.
|
1996 | - बाई यमुनाबाई ल. नायर धर्मादाय रुग्णालय आणि टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय, ह्यांनी दि. 4 सप्टेंबर 1995 पासून दि. 3 सप्टेंबर 1996 पर्यंत आपले अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले.
- महापौरपद मागासवर्गीय नागरिकांसाठी आरक्षित. तद्नुसार, प्रथमच महापौरांची नियुक्ती.
- बॉम्बे चे मुंबई असे नामकरण(महाराष्ट्र अधिनियम क्र. 25-1996).
|
1997 | - महानगरपालिका निवडणूक प्रभागांची संख्या आणि सीमा ह्यांची पुनर्निश्चिती.
- राज्य निवडणूक आयुक्त ह्यांच्या पर्यवेक्षण, मार्गदर्शन आणि नियंत्रणाखाली दि. 23 फेब्रुवारी 1997 रोजी दहावी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली आणि दि. 10 मार्च 1997 पासून नवी महानगरपालिका अस्तित्त्वात आली.
- दि. 10 मार्च 1997 रोजी प्रथमच पाच नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली.
|
1998 | मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 मध्ये सुधारणा करुन, दि. 19 एप्रिल 1998 पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये ’cाहापौरांसह परिषद पध्दती“ लागू करण्यात आली. (1998 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. दहा आणि तेरा). |
1999 | - महापौरांसह परिषद पध्दती रद्द करुन, मुंबई महानगरपालिकेत जुन्या पध्दतीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. (महाराष्ट्र अधिनियम क्र. 27-1999) त्याअनुषंगाने दि. 29 एप्रिल 1999 रोजी महापौर निवडणूक घेण्यात आली.
- उप-महापौर आणि विरोधी पक्षनेता, ह्या पदांची तरतूद करण्यात आली. (महाराष्ट्र अधिनियम क्र. 27-1999).
- महापौरांस विवक्षित अधिकार देण्यात आले. (महाराष्ट्र अधिनियम क्र. 27-1999).
|
2000 | - महापौर आणि उप-महापौर ह्यांच्या पदांचा कालावधी 21/2 वर्षांपर्यंत वाढविण्यात आला. (महाराष्ट्र अध्यादेश क्र. 7-2000).
- सोळा प्रभाग समित्यांची स्थापना दि. 7 जानेवारी 2000 पासून करण्यात आली. (अद्ययावत सुधारित मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 चे कलम 50 ट ट).
|
2002 | - सदस्यांची संख्या 221 वरुन 227 करण्यात आली. (महाराष्ट्र अध्यादेश क्र. 28-2001).
- राज्य निवडणूक आयुक्त ह्यांच्या पर्यवेक्षण, मार्गदर्शन आणि नियंत्रणाखाली दिनांक 10 फेब्रुवारी 2002 रोजी 11 वी सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली आणि दिनांक 10 मार्च 2002 पासून नवीन महानगरपालिका अस्तित्त्वात आली.
- सभागृह नेता ह्या पदाची तरतूद करण्यात आली. (महाराष्ट्र अधिनियम क्र. 11-2002).
- सन 2002-2003 हे वर्ष राजे एडवर्ड स्मारक रुग्णालयाचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे करण्यात आले.
|
2007 | - महानगरपालिका निवडणूक प्रभागांची संख्या आणि सीमा यांची पुनर्निश्चिती.
- राज्य निवडणूक आयोगाच्या अधिक्षण, नि र्देशन आणि नियंत्रणांतर्गत 1 फेब्रुवारी 2007 रोजी बारावी सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून 10 मार्च 2007 रोजी नवीन महानगरपालिका अस्तित्वात आली.
- महापौर आणि उप महापौर या पदाची निवडणूक हात उंचावून मतदान घेण्याकरिताचा नियम (दिनांक 15 फेब्रुवारी 2007 ची सूचना क्र. बीएनएम/5005/46/सीआर7/भाग चार/नवि 32 अन्वये).
- वैधानिक आणि विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक हात उंचावून मतदान घेण्याकरिताचा नियम (दिनांक 21 फेब्रुवारी 2007 ची सूचना क्र. मुंमनपा. 4007/59/सीआर 19/नवि-32 अन्वये).
- समित्यांवर नगरसेवकांना नामनिर्देशित करण्यासंबंधी महानगरपालिकेतील प्रतिष्ठीत वा नोंदणीधारक पक्ष वा गटांची सापेक्ष संख्या विचारात घेवून सभागृह नेता, विरोधी पक्ष नेता आणि अशा प्रत्येक पक्ष वा गटाचे नेते यांसमवेत सल्लासलतीने मुंबई महानगरपालिका अधिनियमामध्ये सुधारणा (दिनांक 27 फेब्रुवारी 2007 चा महाराष्ट्र अध्यादेश क्र. दोन अन्वये).
- नामनिर्देशित नगरसेवकांची नेमणूक करण्याकरिता महानगरपालिकेतील प्रतिष्ठीत वा नोंदणीधारक पक्ष वा गटांची सापेक्ष संख्या विचारात घेवून नियम आणि कार्यपध्दतीमध्ये फेरफार. (दिनांक 21 फेब्रुवारी 2007 ची सूचना क्र. बीएनएम/5007/60/सीआर20/नवि 32 आणि 21 एप्रील 2007 ची सूचना क्र. बीएनएम/5007/72/सीआर 22/नवि 32 अन्वये).
|