महापालिका आयुक्त
शतकाहूनही अधिक कालावधीमध्ये मुंबईत स्थानिक स्वराज्य संस्था रचनेचा सर्वंकष विकास होत असताना महापालिका आयुक्त हे त्यात सुत्रधार पद राहीले आहे. मुंबई महापालिका अधिनियमाखाली नमूद अधिकाऱयांपैकी ते एक आहेत. त्यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य शासनाकडून मुंबई महापालिका अधिनियम कलम ५४ अंतर्गत करण्यात येते. शहरातील विविध मुलभूत सेवा – सुविधा जसे की पाणीपुरवठा, रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, सांडपाणी यांचे परिरक्षण करण्याची तसेच विविध सेवा परिणामकारकरित्या नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.
त्यांना त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, महानगरपालिका उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आणि विविध खात्यांचे प्रमुख हे सहाय्य करीत असतात.
महापालिका आयुक्तांचे तपशील
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांची नेमणूक महाराष्ट्र शासनामार्फत मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम ५४ अंतर्गत केली जाते. महानगरपालिका आयुक्तांनी त्यांना नेमून दिलेल्या खात्यांकरिता आयुक्त म्हणून ते कार्यरत असतात. सद्यस्थितीत चार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त कार्यरत आहेत.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त तपशील
महानगरपालिका उप आयुक्त
महानगरपालिका उप आयुक्तांची नेमणूक मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या विविध कलम अंतर्गत आणि महानगरपालिका आयुक्त / अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त यांना त्यांच्या जबाबदाऱया निभावताना सहाय्य करावे म्हणून केली जाते. उप आयुक्तांची नेमणूक महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्र शासनाच्या संमतीने करण्यात येते.
महानगरपालिका उपायुक्तांची यादी
सहाय्यक आयुक्त
सहायक आयुक्त हे विभागांचे प्रशासकीय प्रमुख असतात आणि नागरिकांना दैनंदिन सेवा – सुविधा पुरविण्यामध्ये त्यांची मुख्य भूमिका असते. मुंबई महानगर हे २४ प्रशासकीय विभागांमध्ये विभागले असून या प्रत्येक विभागाचे प्रमुख हे सहायक आयुक्त असतात. (पूर्वी त्यांना विभाग अधिकारी म्हणून ओळखले जात असे.) त्यांची नेमणूक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिफारशीनुसार महानगरपालिका करीत असते.
सहाय्यक आयुक्त यांची यादी
महापालिकेची खाती
प्रत्येक खात्याचे प्रमुख हे खातेप्रमुख म्हणून ओळखले जातात आणि त्यांची नियुक्ती महानगरपालिका करीत असते.
खाते प्रमुखांची यादी
शेवटचे अद्ययावत ३१/१२/२०१६