रचना

महाराष्ट्र अधिनियम 1975 च्या क्र. अन्वये, सन 1976 मध्ये महानगरपालिकेने वृक्ष प्राधिकरणाची रचना करण्यात आली होती. महाराष्ट्र अधिनियम 1996 च्या क्र. सात अन्वये वृक्ष प्राधिकरण अधिनियमात उपसूचना मांडून वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत अध्यक्षांबाबत बदल आणले होते. या उपसूचनेनुसार महापौरांऐवजी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त वृक्ष प्राधिकरणाच्या सभेत चालवतील. उपरोक्त सुधारणेनुसार सार्वत्रिक निवडणुकीनंतर महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाची पुनर्स्थापना करुन 13 नगरसेवक आणि 10 नामनिर्देशित सदस्यांची नेमणूक करते.

महानगरपालिकेचा दिनांक 27 नोव्हेंबर 1975 चा ठराव क्रमांक 1047 अंतर्गत स्थापित रुढीनुसार बाजार व उद्यान समितीचे अध्यक्ष हे वृक्ष प्राधिकरणाचे अधिकारान्वये सदस्य असतात.

वृक्ष प्राधिकरण वृक्षांचा पाडाव रोखण्यासहित आणि उद्यान खात्यामार्फत पुरेशा संख्येने नवीन वृक्षारोपण करतात. प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोबर किंवा पूर्वी वृक्ष प्राधिकरण अर्थसंकल्पीय अंदाज तयार करुन तो महानगरपालिकेस त्यांच्या अंतिम संमतीकरिता पाठवितात

विद्यमान रचना

वृक्ष प्राधिकरणामध्ये सध्या 25 सदस्य आहेत

Member List Tree Authority 2021-22