१. | विभागाचे नाव | महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांचे खाते |
२. | विभागाची कार्ये आणि सेवा | महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे वैधानिक लेखापरीक्षक आहेत. मुंबई महानगरपालिका अधिनिय 1888 च्या कलम 78 अ (सुधारित) खालील तरतुदीनुसार महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांची नेमणूक राज्य शासन, महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, 2011 च्या कलम 2 च्या प्रारंभाचा दिनांक 10 मार्च, 2011 रोजी व तेव्हापासून विहित करण्यात येतील अशा अटी व शर्तीवर महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील सह संचालकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसेल अशा योग्य अधिका-याची महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक म्हणून प्रतिनियुक्तीने नियुक्ती करील. जो या अधिनियमान्वये जी कर्तव्ये पार पाडण्याविषयी त्यास निदेश देण्यात आले असतील ती कर्तव्ये पार पाडील. तसेच, महानगरपालिका निधी, पाणी व मलनिःसारण निधी आणि पाणीपुरवठा व मलनिःसारण एकत्रित कर्ज निधी यांच्या लेखापरीक्षेसंबंधी महानगरपालिकेने किंवा स्थायी समितीने त्यास जी इतर कर्तव्ये पार पाडण्यास फर्मावले असेल ती कर्तव्ये आणि बृहन्मुंबई वीजपुरवठा व परिवहन निधीच्या लेखापरीक्षेसंबंधी महानगरपालिका किंवा बेस्ट समितीने त्यास जी इतर कर्तव्ये पार पाडण्यास फर्मावले असेल ती कर्तव्ये तो पार पाडील. 1. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 135 (1) खालील तरतुदीच्या अनुपालनार्थ महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक महानगरपालिकेच्या लेख्यांची मासिक तपासणी व लेखापरीक्षा करील आणि त्यावरील अहवाल स्थायी समितीकडे पाठवील 2. कलम 136 च्या तरतुदीनुसार महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक या अधिनियमाखाली त्यांच्याकडे सोपविलेली इतर कोणतीही कर्तव्ये व त्यास प्रदान केलेले इतर कोणतेही अधिकार यांच्या जोडीला अनुसूची ईई मध्ये विनिर्दिष्ट केलेली कर्तव्ये बजावील आणि त्यात विनिर्दिष्ट केलेल्या अधिकारांचा त्यास वापर करता येईल. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 137(3) च्या तरतुदीच्या अनुपालनार्थ महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक अर्थसंकल्प ‘अ’ (मुख्य अर्थसंकल्प), ‘ब’ (सुधार योजना), ‘ई’ शिक्षण निधी, ‘ग’ (पा.पु.म.नि.) यांच्या संबंधातील बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लेखांवरील लेखापरीक्षा अहवाल स्थायी समितीला माहितीकरिता आणि विचारार्थ सादर करील. तसेच मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम 137 (अ) च्या तरतुदीच्या अनुपालनार्थ महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक, अर्थसंकल्प ‘क’ च्या संबंधात बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन समितीस माहितीकरिता व विचारार्थ सादर करील. महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक या अधिनियमाच्या कलम 78 ब खाली नेमलेले सहाय्यक लेखापरीक्षक, लिपिक व कर्मचारी यांवर स्थायी समितीच्या आदेशाच्या आधिनतेने यांची कृत्ये व कार्यवाहया यावर पर्यवेक्षण करील व नियंत्रण ठेवील . |
३. | महत्वाच्या कार्यालयांची यादी | 1.महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांचे खाते महापालिका मुख्य कार्यालय, विस्तारीत इमारत, ६ वा मजला, महापालिका मार्ग, मुंबई- ४००००१ दूरध्वनी क्र. 22620251 (विस्तारित 4630)/22754482 (वैयक्तिक)/22754000 2. महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांचे खाते हॉकर्स प्लाझा कार्यालय, दादर, दूरध्वनी क्र.24365368 अ. व्यय लेखापरीक्षा विभाग (शहर) ब. अहवाल लेखापरीक्षा विभाग क. भविष्य निर्वाह निधी व निवृत्ती वेतन लेखापरीक्षा विभाग ड. शहर लेखापरीक्षा विभाग - दूरध्वनी क्र.24365369 ई.पाणी पुरवठा व मलनिःसारण लेखापरीक्षा विभाग परिमंडळ 1 व 2, दूरध्वनी क्र.24365365 3.महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांचे खाते परळ कार्यालय, पोईबावडी म्युनि. स्कूल अ. रुग्णालये लेखापरीक्षा विभाग दूरध्वनी क्र.24113163 ब. सुधार लेखापरीक्षा विभाग दूरध्वनी क्र. 24182035 क. शिक्षण निधी लेखापरीक्षा विभाग ड. भांडार, परिवहन आणि अग्निशमन लेखापरीक्षा विभाग 4.महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांचे खाते पश्चिम उपनगरे लेखापरीक्षा विभाग, परिमंडळ 3,4 आणि 7 बांद्रा कार्यालय, दूरध्वनी क्र.26441847 5.महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांचे खाते पाणी पुरवठा व मलनिःसारण लेखापरीक्षा विभाग, परिमंडळ 3,4 आणि 7 कांदिवली कार्यालय दूरध्वनी क्र.28018613 6.महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांचे खाते पूर्व उपनगरे लेखापरीक्षा विभाग, परिमंडळ 5 आणि 6 चेंबूर कार्यालय, दूरध्वनी क्र. 25281955(307)/25282305 7. महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांचे खाते पाणी पुरवठा व मलनिःसारण लेखापरीक्षा विभाग, परिमंडळ 5 आणि 6 घाटकोपर कार्यालय, दूरध्वनी क्र.25167524 8.महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांचे खाते जकात लेखापरीक्षा विभाग, कांजुरमार्ग कार्यालय, दूरध्वनी क्र.022-25770107 विस्तारीत क्र.:- 121 9.महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांचे खाते बृहन्मुंबई विद्युत पुरवठा व परिवहन उपक्रम लेखापरीक्षा विभाग , कुलाबा कार्यालय, दूरध्वनी क्र.22024446 |
४. | महत्वाच्या उभारणीची व जोडणीची यादी | निरंक |
५. | चालू असलेले प्रकल्प | निरंक |
६. | माहितीचा अधिकार जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपिलिय अधिकारी | जन माहिती अधिकारी श्री. न. रा. वालेंद्र, लेखापरीक्षा अधिकारी , महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांचे खाते, हॉकर्स प्लाझा कार्यालय, दादर दूरध्वनी क्र. 24365368 प्रथम अपिलिय अधिकारी श्री. ना. भा. रिंगणे, महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षक महानगरपालिका मुख्य लेखापरीक्षकांचे खाते, मुख्य कार्यालय. दूरध्वनी क्र. 22620251 (विस्ता. 4630)/ 22754482 (वैयक्तिक)/ 22754000 |
७. | कार्यालयातील लैंगिक शोषण प्रतिबंधक समिती | 1.श्रीम. सी. अं. काळे,ले.प.अ.. - अध्यक्षा 2. श्री. न.रा. वालेंद्र, ले.प.अ. - सदस्य 3.श्रीम. वृं आ. पाटील, ले.प.अ. -सदस्य 4.श्रीम. सु. मि. मराठे, ले.प.अ. - सदस्य 5.श्रीम. नि.फा.अ.शेख,ले.प.अ.-सदस्य 6.श्रीम. स्वा. श.गोगटे, ले.प.अ.-सदस्य 7.श्रीम. अ.वि. रणशूर ,ले.प.अ. -सदस्य 8.श्रीम. सु.दि. पावसकर, ले.प.अ.- सदस्य 9.अशासकीय संस्था सदस्य |
८. | महत्वाची साध्य केलेली कामे | निरंक |
९. | विशेष महत्वाच्या घटना | निरंक |
१०. | ईतर कार्यालयीन माहिती | निरंक |
| |