
मुंबई ही आपल्या कीर्तीवर उभी आहे. हे शहर या शहरातील रहिवाशांनी वसवलेले आहे. मुंबई ही काँक्रीटची बनली असली तरी ती सर्वासाठी आहे
मुंबई हे बेट पोर्तुगीजांनी इग्लंडचे राजे चार्ल्स-दुसरा यांनी कॅथरिनसोबत विवाह केला तेव्हा त्यांना विवाहाचा हुंडा म्हणून देण्यात आले होते. हास सात बेटांचा गट ईस्ट इंडिया कंपनीस भाडयाने देण्यात आला होता. त्या कंपनीने ज्या व्यक्ती तेथे आल्या आणि स्थिरस्थावर झाल्या अशांना व्यवसाय आणि धर्माचे स्वातंत्र्य दिले. प्रारंभी काही पारशी आणि गुजराती आले परंतु लवकरच मोठया संख्येने येथे येवू लागले.
हे 17 व्या शतकाच्या मागील काळात होते. आजही मुंबई ही स्थलांतरित लोकांचे शहर आहे. संपूर्ण देशातील लोक येथे स्थिरस्थावर होण्यासाठी येत असतात. ह्यामुळे मुंबईच्या समाजामध्ये बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक रंग भरले गेले आहेत.
18 व्या शतकामध्ये मुंबईचा विकास होत गेला आणि हे शहर स्वातंत्र्य चळवळीतील
सैनिकांचे एक प्रमुख केंद्रही झाले. ब्रिटीशांनी आपली राजेशाही सुरत पासून मुंबई पर्यंत ज्याचे पूर्वीचे नाव बाँम्बे होते, या ठिकाणी स्थलांतरीत केली. पहिली रेल्वे रुळ बाँम्बे ते ठाणे असा टाकण्यात आला होता.
स्वातंत्र्य लढयाला आकार देण्यात बॉबेने महत्वाची भूमिका पार पाडली होती. पहिल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली सभा येथे झाली आणि गांधीजींनी ‘भारत छोडो’ हा नारादेखील याच ठिकाणी दिला.आज मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे. सन 1996 मध्ये बाँम्बेचे पुनर्नामकरण मुंबई असे झाले