सुधार समितीची रचना शहराची सुधारणा करण्याच्या हेतुकरिता झाली आहे. समितीमध्ये अध्यक्षांसहित 26 समिती सदस्य असतात.

कार्य

सुधार समितीच्या प्रत्येक महिन्या सभेकरिता कार्यपत्रिकेवर समावेश असलेल्या कामकाज विचारात घेण्यात येतो त्यामध्ये प्रशासनाकडून मिळालेले पत्र,महानगरपालिका आणि तिचया अन्य समितींकडून मिळालेला पत्रव्यवहार, नगरसवेकांकडून पत्रे आणि सदस्यांकडून आलेल्या ठरावाच्या सूचना.

मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 49आय (क) अन्वये, जर समितीच्या सदस्यांपैकी चारपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांनी सहीनिशी लेखी मागणी केली असता सभापती कोणतेही कामकाज चालविणयाकरिता विशेष सभा बोलाविल.

सुधार समिती आपले कोणतेही अधिकार आणि कर्तव्ये समितीच्या सदस्यांचा समावेश असलेल्या उप समितीस देवू शकते.

प्रचालन

मुं.म.न.पा. अधिनियमाच्या 49 आय (अ) अन्वये, सुधार समितीची सभा म॑िन्याूि एकदा आणि आवश्यक असेल अशा इतर वेळी भरेल.

मुं.म.न.पा. अधिनियमाच्या 49 आय (ड) अन्वये, सभेचे कामकाज चालविण्याकरिता सभेत निदान आठ सदस्य उपस्थित असणे आवश्यक आहे.

मुं.म.न.पा. अधिनियमाच्या 49 आय (फ) अन्वये, सुधार समिती सभेसमोर असलेल्या कामकाजावर निर्णय घेताना सभेत उपस्थित असलेल्या समितीच्या सदस्यांच्या बहुमताने घेतात.

रचना

सुधार समिती 26 सदस्यांची मिळून बनलेली असते. (कलम 49 ब). महानगरपलिका प्रत्येक सार्वत्रिक निवडणूकीनंतर, पहिलया सभेत आपल्या सदस्यांपैकी 26 सदस्यांची सुधर समितीचे सदस्य म्हणून नेमणूक करील.(कलम 49 क). सुशार समितीच्या सदस्यांपैकी निममे सदस्य प्रत्येक वर्षी एक एप्रिल रोजी मध्यान्ही सेवानिवृत्त होतील. सुधर समितीची रचना करण्यात आल्यानंतर एक वर्षाने कोणते सदस्य सेवानिवृत्त झाले पाहिजेत हे निकटपूर्तीच्या एक मार्चपूर्वी सभापती निर्रारित करील अशा वेळी व अशा रितीने चिठ्ठया टाकून ठरविणयात येईल. (कलम 49ई (ब)). महानगरपालिका मार्च महिनयातील आपल्या सामान्य सभेत तिने पूर्वी नेमलेले जे सदस्य वर सांगितल्याप्रमाणे वेळोवळी सेवानिवृत्त होणार असतील अशा सदस्यंच्या जागा भरण्यासाठी सुधार समितीच्या नवीन सदस्यांची नेमणूक करील.

कामकाज

कामकाज चालविण्यासाठी सुधार समिती आपली पहिली सभा महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयात भरविल. उक्त समितीस अशा सभांच्या तिला योग्य वाटतील असे विनियम पुढील शर्तींच्या अधीनतेने, वेळीवेळी करता येतील.(कलम 49आय).

सुधार समितीची सभा महिन्यातून एकदा आणि आवश्यक असेल अशा इतर वेळी भरेल.(पोटकलम (अ)). ( प्रत्येक सभेची सूचनेमध्ये दिवस, वेळ आणि ठिकाण आणि महानगरपालिका चिटणीसांनी तयार केलेले (कार्यक्रमपत्रिका व सहपत्र) सदस्यांना त्यांच्या निवासस्थानी पाठविणे.)

सुधार समितीची पहिली सभा महापौर निश्चित करतील त्या दिवशी व त्या वेळेला घेण्यात येईल(कलम 49आय (ब)).

सुधार समितीच्या सभापतीस योग्य वाटेल त्या त्या वेळी उक्त समितीची विशेष सभा बोलाविता येईल आणि समितीच्या सदस्यांपैकी चारपेक्षा कमी नसतील इतक्या सदस्यांनी सहिनिशी लेखी मागणी केली असता सभापती कोणतेही कामकाज चालविणयासाठी अठ्ठेचाळीस तासांच्या आत विशेष सभा बोलाविल (पोटकलम (क)).

सुधार समितीच्या सभेस सुरुवातीपासून अखेरपर्यंत निदान 9 सदस्य उपस्थित असल्याखेरीज त्या सभेचे कोणतेही कामकाज चालविण्यात येणार नाही.(पोटकलम (ड)).

आयुक्तांस समितीच्या सभेस उपस्थित राहण्याचा आणि त्यात होणा-या चर्चेत भाग घेण्याचा हक्क असून मात्र त्यास अशा सभेत कोणत्याही प्रस्तावार मतदान करण्याची किंवा तो मोडण्याची मुभा असणार नाही.

मुंबई शहराच्या विकासाकरिता सुधार समितीची रचना करण्यात आली आहे.