मृत्यु दाखल्यासाठी येथे कोण अर्ज करु शकतात?
मुंबईमध्ये नोंदणी झालेल्या सर्व मृत्युंकरिता नागरिक मृत्यु दाखला घेण्याकरिता येथे अर्ज करु शकतात.
मुंबईमध्ये नोंदणी झालेल्या सर्व मृत्युंकरिता नागरिक मृत्यु दाखला घेण्याकरिता येथे अर्ज करु शकतात.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने स्थापित केलेल्या कोणत्याही 24 विभागातील जवळील नागरी सुविधा केंद्रास (सीएफसी) भेट द्या. जन्म/मृत्युकरिताचे अर्ज यासारखे काही अर्ज बृमुंमनपामध्ये यापूर्वीच अर्जदाराच्या जन्माची नोंद असल्यास, इंटरनेटची जोडणी असलेल्या कोणत्याही संगणकाद्वारे, आपल्या घरातून/ कार्यालयातून वा सायबर कॅफेतून आमच्या नागरी संकेतस्थळास भेट देवून ऑनलाईन अर्ज नमुना भरता येतील.
या प्रकरणामध्ये आपण आपल्या जवळील विभागामध्ये पुढील मदतीकरिता संपर्क साधू शकता. कृपया नोंद घ्या की, सन 1996 नंतरचे अभिलेख या प्रणालीमध्ये उपलब्ध आहेत परंतु 1996 पूर्वीचे अभिलेख अद्यापपर्यंत या पध्दतीमध्ये उपलब्ध होणार नाहीत.
या प्रणालीमध्ये आपला नोंद असलेला अभिलेख शोधण्यासाठी रुग्णालय/सुशृषा गृहे/प्रसुति गृहे यांनी आपणास दिलेला नोंदणी क्रमांक कृपया टाकण्यात यावा.
जर आपणांस नोंदणी क्रमांक देणे शक्य नसल्यास लिंग, जन्म दिनांक, विभाग, वडिलांचे नाव, आईचे नाव किंवा रुग्णालयाचे नाव अशा प्रकारचे अन्य बाबी आपण देवू शकता.
आपल्या निदर्शनास नानाविध अभिलेख आल्यास कृपया आपला अभिलेख निवडावा.
आपणांस प्रती हव्या असल्यास “प्रतींची संख्या” या विभागात दर्शविल्याप्रमाणे प्रतींच्या संख्या भरावी.
कृपया पोहोच कोणत्या प्रकारे पाहिजे ते भरावे. उदा. आपण सदर दाखला विभागामधून घेवू इच्छिता वा आपल्या पत्त्यावर कुरियरने पाठविण्यात यावे. जर आपण दाखला कुरियरने घेणार असाल तर अर्ज केल्याच्या दिनांकापासून सात दिवसांच्या आत आपणाकडे पोहोचेल. जर कुरियरने पोहोच हवी असल्यास प्रपत्र सादर करण्यापूर्वी कृपया पत्ता पुन्हा पडताळून घ्यावा.
वरील अर्जदाराच्या पत्ता वेगळा असल्यास पोहोच पत्ता भरावा.
जर आपणास स्वतः नासुकें मधून प्रमाणपत्र घ्यावयाची इच्छा असल्यास व्यक्तीशः भरावे
अधिदान मार्गाद्वारा प्रचलित असलेल्या बँकांमार्फत बँकींग सुविधेने ऑनलाईन अधिदान करु शकता. एकदा आपण अधिदान ऑनलाईन केले तर कृपया आपणास मिळालेल्या व्यवहाराची पोहोच पावतीची नोंद घ्यावी.
अर्ज मुद्रीत करण्यापूर्वी अर्जामध्ये तरतूद असलेल्या "प्रीव्यू" कळचा वापर करु शकता.
प्रपत्र दिसण्याकरिता प्रीव्यू वर क्लीक करा. प्रीव्यू पानावरील “एडीट” या ठिकाणी येवून क्लिक करुन आपण बदल करा.
एकदा आपण अर्ज सादर केल्यानंतर मुद्रीत आवृत्ती दिसेल. आपण आता मुद्रीत करु शकता.
अर्जदाराने नासुकें येथे आवश्यक कागदपत्रांसमवेत स्वाक्षरी केलेला अर्ज सादर करणे आवश्यक असते. नासुकें कर्मचारी अर्ज संगणक प्रणालीमध्ये भरेल (यापूर्वी बृ.मुं.म.न.पा. कडे आपल्या जन्माची नोद असेल तर) नासुकें कर्मचारी अर्जदाराकडून आवश्यक कागदपत्रांसहित शुल्क संकलित करतो ( प्रतींच्या संख्येनुसार). अंतिम क्षणी,नासुकें कर्मचारी अर्जदारास प्रमाणपत्र ( प्रतींच्या संख्येनुसार) आणि शुल्क पावती देतो. जर आपण येथे जन्म दाखल्यासाठी अर्ज करु शकता.